‘टायटॅनिक’ चित्रपटातील ‘कॅप्टन ऑफ द शिप’चे निधन

लंडन

टायटॅनिक चित्रपटात कॅप्टन ऑफ द शिपची भूमिका साकारणारे अभिनेते बर्नार्ड हिल यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बर्नार्ड यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बर्नार्ड यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री बार्बरा डिक्सन यांनी बर्नार्ड यांच्या मृत्यूबाबत सोशल मिडीयावरून माहिती दिली आहे.

बार्बरा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, बर्नार्ड हिल यांच्या निधनच्या बातमीने अत्यंत दुःख झाले. १९७४ मध्ये विली रसेलच्या ‘जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट’ या मालिकेमध्ये आम्ही एकत्र काम केले होते. बर्नार्ड एक अप्रतिम अभिनेता होते. त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी एक प्रकारचा सन्मान होता. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

बर्नार्ड यांनी ‘टायटॅनिक’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘टायटॅनिक’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटात बर्नार्ड यांनी कॅप्टन एडवर्ड स्मिथची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली होती. बर्नार्ड हिल यांच्या ‘टायटॅनिक’ आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या दोन्ही चित्रपटांना ११ ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांनी टीव्हीवरील अनेक मालिकांमध्येदेखील काम केले आहे. १९८३ च्या ‘बॉईज फ्रॉम द ब्लॅकस्टफ’ या टिव्ही मालिकेसाठी त्यांना बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top