टिकटॉकने अमेरिकेच्या सरकारला कोर्टात खेचले, गळचेपीचा आरोप

वॉशिंग्टन – टिकटॉक या व्हिडिओ शेअरींग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नव्या कायद्यानुसार सरकारने लादलेल्या अटीच्या विरोधात अमेरिकेच्या सरकारविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. नव्या कायद्यानुसार टिकटॉकला आपला व्यवसाय अमेरिकेतील कोणत्याही नोंदणीकृत गुंतवणूकदाराला विकण्याची अट घालण्यात आली आहे. तसे न केल्यास टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घालण्यात येणार आहे.
अमेरिकेचा हा नवा कायदा अन्यायकारक असून माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आहे,असा आक्षेप टिकटॉक आणि चिनमधील त्याची मूळ कंपनी बाईटडान्सने मंगळवारी अमेरिकेच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.
अमेरिकन सरकारने टिकटॉकपासून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण दाखवून कंपनीवर नव्या कायद्यानुसार जाचक अटी लादल्या आहेत. मात्र टिकटॉकपासून अमेरिकेच्या सुरक्षेला कसा काय धोका पोहोचू शकतो याचे ठोस पुरावे सरकारने दिलेले नाहीत,असा युक्तिवाद टिकटॉक आणि बाईटडान्सने आपल्या याचिकेद्वारे केला आहे. तसेच हा कायदा पूर्णपणे असंवैधानिक आहे, बेकायदेशीर आहे,असा दावा टिकटॉकने केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top