टिपू सुलतान की कृष्णराजा वडियार ? म्हैसूर विमानतळ नामकरणाचा वाद

बंगळुरू – कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसने भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही.आता तर म्हैसूर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलाच वाद सुरू झाला आहे.भाजपा म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचं नाव देण्यास विरोध करत आहे.त्यामुळे या प्रकरणाला आता जातीय वळण लागण्याची शक्यता आहे.भाजपने म्हैसूर विमानतळाला कृष्णराजा वडियार यांचे नाव देण्याची मागणी लाऊन धरली आहे.

कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन म्हैसूर विमानतळाच्या
नामकरणावरुन चांगलेच गाजले.मंत्री प्रियांक खरगे यांनी नामकरणाचा प्रस्ताव विधिमंडळात मांडला होता. तो मुद्दा काँग्रेस आमदार प्रसाद अब्बैया यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. गृहनिर्माण मंत्री बी झेड जमीर अहमद खान यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.तर दुसरीकडे म्हैसूर विमानतळाला कृष्णराजा वडियार यांचे नाव देण्याची मागणी भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांनी केली आहे. टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.त्यामुळे हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन आता भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपाने आपल्या सत्ता काळात टिपू एक्स्प्रेसचे नाव बदलून ते वाडियार एक्सप्रेस ठेवले होते.त्यामुळे भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेस म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा घाट घालत आहे.

भाजपाने पाठ्यपुस्तकात टिपू सुलतानला म्हैसूर टायगर ही दिलेली पदवी काढून टाकली होती.त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घातली होती.मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार या मुद्द्यांवर अद्याप काहीच बोललेले नाहीत.आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत.त्यामुळे भाजपा हिंदू मतांचे ध्रुविकरण करण्यासाठी या मुद्द्यांचा वापर करेल,असे काँग्रेसमधील नेत्यांचे मत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top