Home / News / टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढायला परवानगी! पुणे पोलिसांची उच्च न्यायलयात माहिती

टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढायला परवानगी! पुणे पोलिसांची उच्च न्यायलयात माहिती

मुंबई- २४ डिसेंबर रोजी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढण्यास परवानगी दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली....

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- २४ डिसेंबर रोजी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मिरवणूक काढण्यास परवानगी दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. टिपू सुलतान, मौलाना अबुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्याची परवानगी पुणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत नाकारली होती. मात्र त्यानंतर एआयएमआयएमचे पुणे युनिटचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. त्यानंतर उच्च न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार असल्याचे म्हटले.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेणे हे पोलिसांचे काम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देण्याची वृत्ती आता बदलण्याची वेळ आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हे पोलिसांचे कार्यक्षेत्र आहे. प्रत्येक वेळी कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आम्हाला सांगू नका. कोणत्याही व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. परंतु त्याला कायद्यानुसार घातलेल्या अटी आणि निर्बंधांचे पालन करावे लागेल. तसेच मिरवणूक काढण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्था हे पोलिसांचे कार्यक्षेत्र असून त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तिथल्या परिस्थितीची आम्हाला जाणीव नाही. पोलिसांना ते चांगले माहीत आहे. त्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीसाठी परवानगीची मिळाल्यानंतर खंडपीठाने दखल घेत याचिका निकाली काढली.

Web Title:
संबंधित बातम्या