टॉप केले नसते तर बरे झाले असते दहावीची टॉपर प्राची निगमची व्यथा

लखनऊ –
मी उत्तर प्रदेश दहावी बोर्डाच्या परिक्षेत टॉप केले नसते तर बरे झाले असते. मी अशा प्रकारे समाजमाध्यमांवर माझ्या दिसण्यावरुन ट्रोल झाले नसते, अशी व्यथा प्राची निगम या ९८.५० टक्के गुण मिळवून पहिल्या आलेल्या मुलीने व्यक्त केली आहे.

प्राची निगम ही यावर्षी दहावी बोर्डाच्या परिक्षेत उत्तर प्रदेशातून पहिली आली. या बातमीबरोबर तिचे फोटो समाजमाध्यमांवर झळकले. तिच्या चेहऱ्यांवर असलेल्या केसांमुळे लोकांनी तिच्या बुद्धीमत्तेचे कौतुक करण्यापेक्षा तिच्या दिसण्यावरून तिला ट्रोल केले. एका मुलाखतीत ती म्हणाली की, काही ट्रोलर्सना मी उत्तर दिले आहे. काही जण माझ्या बचावासाठीही पुढे आलेले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकाराने मी व्यथित झाले आहे. मुलींच्या चेहऱ्यांवरचे केस हे हार्मोन्सच्या बदलांमुळे येतात. अर्थात सोशल मिडियावर कोणी काही लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी काहीही करू शकत नाही. प्राचीच्या आईवडीलांनीही तिला या ट्रोलरकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे. या ट्रोलिंगमुळे वाईट वाटले. मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. आमच्या मुलीला सर्वात जास्त गुण मिळाले याचाच आम्हाला अभिमान आहे. प्राचीच्या शाळेचे मुख्याध्यापक व इतर मित्रमंडळीही तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेले आहेत. प्राचीने ९८.५० टक्के गुण मिळवून उत्तर प्रदेशचा गौरव केला आहे, असे मुख्याध्यापकांनी सांगितले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top