टोमॅटो, हिरव्या मिरचीची उच्चांकी आवक! पालेभाज्यांचे भाव गडगडले

चाकण – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये टोमॅटो, वालवड व हिरव्या मिरचीची उच्चांकी आवक झाली. बटाटा, कोबी व लसणाची किरकोळ आवक झाली. कांद्याची आवक स्थिर राहूनही भावात घसरण झाली. फरशी, परवल, फ्लॉवर, गाजर व शेवग्याची आवक घटली. फळभाज्यांसह पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने या आठवड्यात त्यांचे भाव गडगडले आहेत. बाजारात एकूण उलाढाल ३ कोटी, ५० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ७५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावात १,००० रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव ५,००० रुपयांवरुन ४,००० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,१५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ६०० क्विंटलने घटून भावात ३०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून १,७०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १० क्विंटलने घटल्याने लसणाचा कमाल भाव १४ हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांवर पोहोचला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ४०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २३६ क्विंटलने वाढल्याने भावात घट झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top