Home / News / ट्रम्पच्या धोरणांमुळे आयटी सेवा कंपन्यांची चिंता वाढली

ट्रम्पच्या धोरणांमुळे आयटी सेवा कंपन्यांची चिंता वाढली

नवी दिल्ली – भारतीय आयटी क्षेत्रावर ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्कवाढीचा थेट परिणाम झाला नाही. पण या निर्णयामुळे आयटी सेवा कंपन्यांची...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – भारतीय आयटी क्षेत्रावर ट्रम्प प्रशासनाच्या आयात शुल्कवाढीचा थेट परिणाम झाला नाही. पण या निर्णयामुळे आयटी सेवा कंपन्यांची चिंता वाढली आहे.
या आदेशामुळे नव्या ऑर्डर्सवर परिणाम होण्याची शक्यता असून काही ऑर्डर्स रद्द होण्याची किंवा उशिराने मिळण्याची भीती आहे. परिणामी आयटी क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण होऊ शकते. उच्च आयात शुल्कामुळे अमेरिकेच्या जीडीपी वाढीचा काही प्रमाणात फटका बसू शकतो असे काही विश्लेषकांचे मत आहे. भारतीय आयटी कंपन्या अमेरिकेतील ग्राहकांना सेवा पुरवून दरवर्षी सुमारे २५० अब्ज डॉलरचा महसूल मिळवतात. तो येत्या तिमाहीत किती कमी होऊ शकतो. आगामी तिमाहीत या महसूलावर नेमका किती परिणाम होईल याकडे संपूर्ण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या