ट्रम्प यांच्या विरोधातील नागरी फसवणूक प्रकरणी सुनावणी पूर्ण

वॉशिंग्टन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील नागरी फसवणूक प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच याबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्जरादांना फसवण्यासाठी ट्रम्प यांनी संपत्तीबद्दल चुकीची माहिती दिल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. याप्रकणात जर ट्रम्प दोषी आढळल्यास त्यांच्यावर २५० डॉलरचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच त्यांच्या न्यूयॉर्कमधील व्यवसायावर देखील बंदी घातली जाऊ शकते. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत त्यांनी कोणतीही चुकीची माहिती दिली नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती आर्थर अँगोरोन ११ जानेवारी २०२४ रोजी निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या आर्थिक दस्तऐवजांमध्ये अनियमितता असल्याचेही अँगोरोन यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top