Home / News / ट्रायचा नवीन नियम, 20 रुपयात महिनाभर सुरू राहणार सिम कार्ड; दोन मोबाइल नंबर असणाऱ्यांना होणार फायदा

ट्रायचा नवीन नियम, 20 रुपयात महिनाभर सुरू राहणार सिम कार्ड; दोन मोबाइल नंबर असणाऱ्यांना होणार फायदा

New Recharge Rules : सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी यूजर्सला नियमितपणे रिचार्ज करावे लागते. अनेकदा दोन सिम कार्ड असल्याने ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य...

By: Team Navakal

New Recharge Rules : सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी यूजर्सला नियमितपणे रिचार्ज करावे लागते. अनेकदा दोन सिम कार्ड असल्याने ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य होत नाही. अशावेळी टेलिकॉम कंपन्यांकडून रिचार्ज बंद केले जाते. मात्र, आता ट्रायकडून या नियमात बदल करण्यात आला आहे. ट्रायच्या नवीन नियमामुळे आता रिचार्ज न करताही सिम कार्ड जास्त दिवस सुरू राहणार आहे. या नवीन नियमाचा दोन सिम कार्ड वापरणाऱ्या मोबाइल यूजर्सला सर्वाधिक फायदा होईल.

TRAI ने एक नियम लागू केला असून, ज्यामुळे मोबाइल युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. या नियमांनुसार तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये किमान प्रीपेड बॅलन्स ठेवून तुमचे सिम कार्ड सुरू ठेवू शकता. रिचार्ज न करता तुमचे सिम कार्ड 90 दिवस सुरू राहू शकते. तसेच, अतिरिक्त 20 रुपये खर्च करून सिम कार्डची मुदत आणखी काही दिवस वाढवता येईल. मात्र, यासाठी काही अटी लागू असतील

टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ऑटोमॅटिक नंबर रिटेन्शन स्कीम लागू केली आहे. जिओ, एअरटेल, Vi किंवा BSNL च्या यूजर्सला या नवीन नियमाचा फायदा मिळणार आहे. TRAI च्या नियमानुसार तुम्ही जर रिचार्ज केले नाही, तर 90 दिवसांनंतर तुमचे सिम कार्ड बंद होते. तसेच, कंपनीकडून तो नंबर इतर ग्राहकांना दिला जाऊ शकतो.

तुमच्या सिम कार्डमध्ये 20 रुपये प्रीपेड बॅलेन्स असल्यास तुम्हाला अतिरिक्त 30 दिवसांची मुदत वाढ मिळेल. हे पैसे तुमच्या अकाउंटमधून कापले जातील व तुमच्या सिम कार्डची वैधता आणखी 30 दिवसांसाठी वाढवली जाईल. अशाप्रकारे तुम्हाला 120 दिवसांची मुदत मिळेल. तसेच, यानंतरही यूजर्सला सिम सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदत दिली जाईल. या नियमाचा फायदा दोन सिम कार्ड वापरणाऱ्या मोबाइल यूजर्सला होणार आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या