ठाकरे गटाचे सुरेश जैन राजकारणातून निवृत्त

मुंबई

ठाकरे गटाचे खानदेशातील ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे. जैन यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभेच्या तोंडावर जैन यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सुरेश जैन सुमारे ४० वर्षांपासून राजकारणात सक्रीय होते.

सुरेश जैन यांनी पत्रात म्हटले आहे की, १९७४ पासून मी राजकारणात सहभाग घेतला आहे. ३४ वर्ष मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केले आणि बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवून शिवसेनेच्या माध्यमातून मला जनतेच्या सेवेसाठी सर्वप्रथम मंत्रिपद दिले. २०१४ नंतर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणामुळे मी हळूहळू सक्रीय राजकारणातून बाहेर पडलो. आता आयुष्याच्या या अंतिम टप्प्यात सक्रीय राजकारणात कोणताही भाग न घेता निवृत्त व्हायचे ठरविले आहे. म्हणून मी ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजिनामा सादर देत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top