ठाकरे गटाच्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा

अहमदनगर- माजी विधानसभा उपसभापती आणि ठाकरे गटातील जेष्ठ नेते विजय औटी यांनी अहमदरनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा जाहीर केला आहे. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके अशी लढत आहे. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते सभा घेत आहेत, शक्तिप्रदर्शन करत आहेत. मात्र आता अहमदरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे सांगितले जाते. निलेश लंकेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top