ठाकरे गटाला आणखी एक झटका? अयोध्या पौळ यांच्या पोस्टची चर्चा

मुंबई- नेते-कार्यकर्ते सोडून जात असल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला गेले काही दिवस एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनी ‘अस्वस्थ आहेत, राजीनामा देण्याच्या तयारीत,’ अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा ठाकरेंना झटका मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
अयोध्या पौळ यांच्या या पोस्टमध्ये, ‘लवकरच ब्रेकिंग न्यूज….अस्वस्थ आहेत, राजीनामा देण्याच्या तयारीत…. #राजकीय_चिखल,’ असे लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टमधून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे स्पष्ट होत नाही, परंतु यावरून ठाकरे गटातीलच कोणीतरी मोठी व्यक्ती राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा संकेत मिळत आहे. अयोध्या पौळ या स्वतःच राजीनाम्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, त्यांच्या एक्स बायोमध्ये शिवसेनेचा कुठलाही उल्लेख नाही, तसेच प्रोफाईल कव्हरमध्येही त्यांनी केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोटसह फोटो वापरला आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top