ठाणे शहरातील रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगच्या रंगात बदल

ठाणे – ठाण्यात सध्या काही महत्वाच्या तसेच अधिक वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी महापालिका आणि वाहतुक पोलिसांच्या मदतीने येथील झेब्रा क्रॉसिंगचा रंग बदलण्यात आला आहे. आधी पांढरा – काळा अशा स्वरुपात असलेला रंग आता पांढरा- लाल अशा स्वरुपात दिसू लागला आहे. त्यामुळे वाहन चालकही काहीसे सर्तक झाल्याचे दिसत आहे.
तीनहात नाका परिसरात हा प्रयोग यशस्वी झाला असून येत्या काही काळात शहरातील सर्व रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंगच्या रंगात बदल केला जाणार आहे.हे पट्टे आता पटकन नजरेला येऊ लागले आहेत. तसेच वाहन चालक देखील यावरुन जाताना सावधानता बाळगत आहेत. पहिल्या टप्यात तीन हात नाका परिसरात कोपरीतील काही महत्वाच्या रस्त्यांसह,
राम मारुती रोड आदींसह इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यानंतर कॅडबरी जंक्शन,पुढे माजिवडा आणि इतर महत्वाच्या चौकातही हा प्रयोग केला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top