Home / News / ठाणे शहरात २ दिवस पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे शहरात २ दिवस पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे – ठाणे शहरातील काही भागात जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे २ दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ठाणे – ठाणे शहरातील काही भागात जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे २ दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे भागात गुरुवारी २६ डिसेंबरला रात्री १२ ते शुक्रवारी २७ डिसेंबरला रात्री १२ पर्यंत असा २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या