Home / News / ठाण्यातील कळवा रूग्णालयात ३०० निवासी डॉक्टर संपावर

ठाण्यातील कळवा रूग्णालयात ३०० निवासी डॉक्टर संपावर

ठाणे – गेल्या आठवड्यात कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ठाणे – गेल्या आठवड्यात कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयातील सुमारे ३०० डॉक्टर संपावर गेले आहेत.याचा गंभीर परिणाम बाह्यरुग्ण विभागावर दिसत असून नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलल्या आहेत.

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास ३०० निवासी या संपामध्ये सहभागी झाले आहेत.डॉक्टर संपावर असले तरी बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. सध्या कळवा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २१३० रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडत आहे. दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.हे सर्व डॉक्टर संपावर ठाम आहेत.

काल शुक्रवारी निवासी डॉक्टरांनी पुन्हा रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत नो सेफ्टी,नो ड्युटी असा नारा देखील देण्यात आला. तर जोपर्यंत निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान,डोंबिवलीतही इंडियन मेडिकल असोसिएशनने २४ तासांच्या सेवा स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. फक्त अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या