ठाण्यात आज पाणी पुरवठा बंद

ठाणे

ठाण्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कटाई नाका ते कल्याण फाटा पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे १ फेब्रुवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते १ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळेमधील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ चा भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती आणि वागळे प्रभाग समिती, नेहरूनगर तसेच कोलशेतमधील रूपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक २ या सर्व भागांमध्ये मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत खालचा गाव २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top