ठाण्यात राम मंदिर सोहळ्याच्यारोषणाईसाठी ७० लाखांचा निधी

ठाणे- अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने शहरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने होणार्‍या या रोषणाईसाठी पालिका या ७० लाखांच्या निधीची तरतूद करणार आहे.

या विद्युत रोषणाई कामासाठी पालिकेने एक प्रस्ताव तयार केला असून त्यानुसार निविदादेखील मागविण्यात येणार आहेत. या विद्युत रोषणाईबरोबरच ठाण्यात मोठमोठ्या मिरवणुकाही निघणार आहेत.विशेष बाब अशी की ठाणे पालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती तशी बिकट स्वरूपाची आहे. तरीही केवळ तात्पुरत्या स्वरुपात विद्युत रोषणाई करणे असे लेबल लावून पालिकेने या ७० लाखांच्या खर्चाच्या तरतुदीची सोय केली आहे.त्याचप्रमाणे ठाणे पालिकेने विद्युत रोषणाईसाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार,पालिकेच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक उत्सवांसाठी दीड कोटींची आर्थिक तरतूद केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top