ठाण्यात २ डिसेंबरपर्यंत १० टक्के पाणीकपात

ठाणे:

जिल्ह्यातील भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यात दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामुळे २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी ठाणे महापालिकेच्या योजनेतून शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. परंतु १० टक्के पाणी कपातीची झळ दररोज बसू नये म्हणून पालिकेने १५ दिवसांत प्रत्येकी एका विभागात पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तसे नियोजन केले आहे. पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने १० टक्के पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर १५ दिवसांतून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणीकपातीची वेळ वाढवून १२ तासांऐवजी २४ तास करण्यात येत आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पाचपाखाडी, टेकडी बंगला, किसननगर १ व २, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे १० टक्के पाणीकपात लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. यासोबतच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top