Home / News / डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी छापेमारी

डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी छापेमारी

पुणे- डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अभिजीत कटकेंच्या पुण्यातील घरी आयकर विभागाने छापेमारी केली. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरीही...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे- डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अभिजीत कटकेंच्या पुण्यातील घरी आयकर विभागाने छापेमारी केली. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरीही छापेमारी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अभिजीत कटके हे भाजपाचे पुण्यातील नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे आहेत. अमोल बालवडकर हे पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून येणारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी देखील अमोल बालवडकर यांना माघार घेण्याची सूचना केली होती . मात्र त्यांनी उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करणार असल्याचे संकेत दिले. यामुळेच त्यांच्या सासऱ्यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्यानंतर चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे .

Web Title:
संबंधित बातम्या