डिसेंबर अखेरीस मुंबई-गोवा विशेष रेल्वेगाड्या धावणार

मुंबई

सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी अनेक मुंबईकर गोव्याला जातात. या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित रेल्वेगाड्यांसह मुंबई-थिविम, पनवेल – करमळी या दरम्यान २८ विशेष फेऱ्या धावणार आहेत. २१ नोव्हेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर तिकीट आरक्षण सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान रात्री १२.२० वाजता गाडी क्रमांक ०११५१ दैनिक विशेष रेल्वेगाडी (१२ फेऱ्या) सुटेल आणि थिविम येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. याच काळात दुपारी ३ वाजता थिविम येथून गाडी क्रमांक ०११५२ दैनिक विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ३.५० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे थांबा असेल. या गाडीला एकूण २२ डबे असून एक वातानुकूलित द्वितीय, तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशी या रेल्वेगाडीची संरचना आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top