Home / News / डीजे लाईटमधून तस्करी! ९ कोटी रुपयांचे सोने जप्त

डीजे लाईटमधून तस्करी! ९ कोटी रुपयांचे सोने जप्त

मुंबई -विविध कार्यक्रमांमध्ये वापरल्या डीजे लाइटमधून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी या...

By: E-Paper Navakal

मुंबई -विविध कार्यक्रमांमध्ये वापरल्या डीजे लाइटमधून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.या कारवाईदरम्यान १२ किलो सोने जप्त करण्यात आले असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे.

मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागातून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना डीजे लाइटच्या आतमध्ये विशिष्ट कप्पे तयार करत त्यात हे सोने लपविल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी या डीजे लाइटच्या गोडाऊनवर छापेमारी केली असता एकूण ६८ लाइटमध्ये अशा प्रकारे सोने तस्करीसाठी विशिष्ट कप्पे केल्याचे आढळून आले. त्यामुळे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाल्याचा अधिकाऱ्यांना संशय असून ते याचा तपास करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या