Home / News / डीपसीक पाठोपाठ आता चीनच्या नवीन एआय मॉडेलची बाजारात एन्ट्री, चॅटजीपीटीपेक्षा उत्तम असल्याचा दावा

डीपसीक पाठोपाठ आता चीनच्या नवीन एआय मॉडेलची बाजारात एन्ट्री, चॅटजीपीटीपेक्षा उत्तम असल्याचा दावा

Alibaba Qwen 2.5-Max : चीनच्या डीपसीक एआय मॉडेलने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या एआय मॉडेलने अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांना टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. यातच...

By: Team Navakal

Alibaba Qwen 2.5-Max : चीनच्या डीपसीक एआय मॉडेलने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या एआय मॉडेलने अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांना टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. यातच आता आणखी एका चीनी एआय मॉडेलची बाजारात एन्ट्री झाली आहे. चीनची प्रसिद्ध टेक कंपनी Alibaba ने Qwen 2.5-Max नावाचे एआय मॉडेल लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे एआय मॉडेल इतर एआयच्या तुलनेत अधिक चांगले आहे.

Alibaba च्या क्लाउड डिव्हिजनचा दावा आहे की  Qwen 2.5-Max परफॉर्मेंसच्याबाबतीत खूपच जबरदस्त आहे. कंपनीने दावा केला आहे की, Qwen 2.5-Max ने DeepSeek R1, OpenAI चे GPT-4o, Meta चे  Llama-3.1-405B आणि DeepSeek च्या V3 ला देखील कामगिरीमध्ये मागे टाकले आहे.

अवघ्या 20 महिन्यांचा कालावधी व 6 मिलियन डॉलर्स खर्चात डीपसीकची निर्मिती झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील टेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे एआयच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी कंपन्यांकडून नवनवीन एआय मॉडेल सादर केले जात आहेत. आता या यादीत अलिबाबाच्या Qwen 2.5-Max चा समावेश झाला आहे.

DeepSeek च्या या यशानंतर इतर अनेक AI कंपन्यांवरी दबाव वाढला आहे. एआयच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात निर्मिती होणारे व अधिक चांगले एआय मॉडेल बाजारात आणावे लागणार आहे. यामध्ये  Alibaba, Tencent आणि Baidu यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या