डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक बंदी

वॉशिंग्टन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या दंगली प्रकरणी दोषी मानत न्यायालयाने ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केले. त्यामुळे ट्रम्प यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. तसेच त्यांना निवडणुकीवेळी मतदान देखील करता येणार नाही. अमेरिकेच्या कोलोरॅडो उच्च न्यायालयाने काल हा निर्णय दिला. रिपब्लिकन अध्यक्षीय प्राथमिक मतपत्रिकेतून ट्रम्प यांचे नाव वगळण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सचिवांना दिले आहेत.
अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराला न्यायालयाने राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.त्यांना न्यायालयात दाद मागण्यासाठी ४ जानेवारी २०२४ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. ५ जानेवारीपासून कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top