तटरक्षक दलासाठीच्या वेगवान बोटींसाठी करार

नवी दिल्ली- संरक्षण मंत्रालयाने आज तटरक्षक दलासाठी १४ वेगवान बोटींच्या खरेदीचा करार केला आहे. मुंबईच्या माझगाव डॉक लिमिटेड बरोबर हा करार केला असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिली.
पेट्रोलवर चालणाऱ्या वेगवान बोटींसाठी हा करार करण्यात आला असून यासाठी एक हजार सत्तर कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा करार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंद महासागरात त्याचप्रमाणे लाल समुद्रात दहशती कारवाया वाढल्या होत्या. त्याविरोधातील कारवायांमध्ये आंतरराष्ट्रीय चमूबरोबर भारतीय तटरक्षक दलही सामील होत असून त्यांनी दोन मोहिमा फत्ते केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाला समुद्रात वेगाने हालचाल करता यावी यासाठी या बोटींची आवश्यकता आहे. त्यासाठी हा करार करण्यात आला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या नौकांची बांधणी पूर्णपणे माझगाव डॉकमध्ये करण्यात येणार आहे. या नौका पुढील ६३ महिन्यांमध्ये तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील होणार असल्याची माहितीही राजनाथसिंह यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top