ताजिकिस्तानमध्ये भूकंपांचे धक्के

दुशांबे

ताजिकिस्तानमध्ये आज सकाळी ६.४२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपचे केंद्र ८० किलोमीटर खोलीवर होते, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपात कोणतीही जिवित किंवा वित्त हानी झाली नाही. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अरबी समुद्रात देखील काल रात्री ९:५२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top