तामिळनाडूमध्ये अवकाळीचा कहर महापुरामुळे गावे-घरे पाण्याखाली

चेन्नई

मिचाँग चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरत असलेल्या तामिळनाडूत पुन्हा एकदा अवकाळी पावसाने कहर केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस झाला. यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. या पूरस्थितीचा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडु सरकारने अनेक जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जारी केली आहे.

थूथुकुडीत परिसरात पुर आल्याने नागरिकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे तुतीकोरीनमधील तिरुचेंदूरमध्ये काल दुपारी १.३० वाजेपर्यंत अवघ्या १५ तासांत ६० मिलिमीटर पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे तेथील धरणांमधूनही पाणी सोडण्यात आल्याने अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top