तामिळनाडूला पुराचा मोठा फटका चेन्नई अद्याप जलमय !१५ गाड्या रद्द

*सलग चौथ्या दिवशी
शाळा कॉलेज बंद

चेन्नई – बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाचा तामिळनाडूतील सव्वा कोटी लोकांना फटका बसला आहे.चेन्नई,तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून चेन्नईमधील अनेक रस्ते अजूनही जलमय आहेत.तसेच शहरातील शाळा,कॉलेजही आज सलग चौथ्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. आज चेन्नईला जाणाऱ्या आणि येणार्‍या १५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.

काल भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे काल पूरग्रस्त भागात सामग्री पोहोचवण्यात आली. द्रमुकचे खासदार टीआर बालू यांनी संसदेत सांगितले की,राज्यात ४७ वर्षांनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळामुळे राज्यात २ दिवसांत ३ महिन्यांचा पाऊस पडला.
चेन्नईमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पुरामुळे आतापर्यंत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चार दिवसांपासून शहरातील अनेक भागात वीज आणि इंटरनेट बंद आहे.मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ५०६० कोटी रुपयांची अंतरिम मदत मागितली आहे.
दरम्यान मिचाँग वादळ आणखी उत्तरेकडे सरकले असून त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top