तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली

बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अंदमान समुद्रात तयार होत असलेल्या मिचाँग चक्रीवादळाचा जोर वाढल्याची माहिती, भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हे चक्रीवादळ १०० किमी ताशी वेगाने मंगळवारी नेल्लोर आणि मछलीपट्टणमला धडकण्याची शक्यता आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ येत्या २४ तासांत आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवार व मंगळवारी ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर पुद्दुचेरी सरकारने पुद्दुचेरी, कराईकल आणि यानममधील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. यासोबतच इतर राज्यांनाही त्यांच्या पथकासह सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. दक्षिण रेल्वेने ६ डिसेंबरपर्यंत तामिळनाडूतील ११८ गाड्या रद्द केल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. किनारी आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये ६ डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांना दक्षिण-पश्चिम बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू आणि किनारी पुद्दुचेरी प्रदेशापासून ४ डिसेंबरपर्यंत दूर राहण्यास सांगितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top