तासगाव तालुक्यातील द्राक्षबागा पाण्याअभावी करपू लागल्या

तासगाव- सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका म्हटले की, द्राक्षबागा डोळ्यासमोर येतात. पण याच द्राक्षबागा आता पाण्याअभावी करपू लागल्या आहेत. तासगावच्या पूर्व भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. काही बागायतदारांनी तर पाण्याअभावी करपून गेलेल्या द्राक्षबागा तोडल्या आहेत.

हा तालुका सध्या दुष्काळाच्या सावटाखाली दिसत आहे. टँकरने पाणी घालून जगवलेल्या द्राक्षबागांचे उत्पन्न गेल्यावर्षीपेक्षा निम्म्याने घटले आहे. भरमसाठ किंमतीची औषधे, खते घालवून पिकवलेल्या द्राक्षांना पाण्याची कमतरता आणि अवकाळीचा फटका बसला आहे. सध्या याठिकाणची जनता दुष्काळाच्या दुष्टचक्रात भरडत चालली आहे. पिकांबरोबरच जनावरेसुद्धा पाण्यासाठी कासावीस झालेली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top