तिलारीत हत्ती परतले बागायतीचे नुकसान

सिंधुदुर्ग –

सिंधुदुर्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तीचा पुन्हा एकदा उपद्रव सुरू झाला आहे. मागील अनेक महिन्यांपासून या भागात न दिसलेले हत्ती आता तिलारी खोऱ्यातील हेवाळे, घाटिवडे, बांबर्डे येथे परतले आहेत. या भागांत हत्तींनी शेतकऱ्यांच्या केळी, नारळ बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हत्ती पुन्हा एकदा तिलारीमध्ये परतल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री तिलारीमध्ये एक सुळे असलेला हत्ती (टस्कर)दाखल झाला. या हत्तीला गावातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top