तीन महिन्यांच्या बंदीनंतर दुधसागर पर्यटनासाठी खुला

पणजी :

गोवा राज्यातील दुधसागर धबधबा तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होताच पर्यटकांना वेध लागतात ते गोव्यातील दुधसागर धबधब्याचे, मात्र या धबधब्यांमध्ये पर्यटक वाहून गेल्याच्या आणि मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळे यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दुधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घातली होती. त्याचबरोबर परित्रपक काढून पर्यटकांसाठी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता बंदीनंतर दुधसागर पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक धबधब्यांवर जात असतात. गोव्यात यावर्षी विविध दुर्घटनांमध्ये काही पर्यटक आणि स्थानिकांनी जीव गमावल्यानंतर राज्यातील वन परिसरातील धबधबे वर्षा पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. त्यात दुधसागर देखील पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला. मात्र, आता तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर दुधसागर धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. याशिवाय गोवा पर्यटन विकास महामंडळाने जीप सफारीसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू केली आहे. तसेच पर्यटन महामंडळाने यासाठी एक एजन्सी स्थापित केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top