‘तुझसे नाराज नहीं जिंदगी ‘चेगायक अनुप घोषाल यांचे निधन

कोलकाता

माजी आमदार आणि ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ या गाजलेल्या गाण्याचे गायक अनुप घोषाल यांचे निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुप घोषाल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याचे सांगितले जात होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. याबाबत ममता यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर म्हटले आहे की, ‘बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या अनुप घोषाल यांच्या निधनाबद्दल मी दु:ख आणि शोक व्यक्त करते’.

कोलकात्यातील अमूल्य चंद्र घोषाल आणि लाबन्या घोषाल यांचे पुत्र असलेल्या अनुप घोषाल यांनी शालेय शिक्षणासोबत संगीताचेही शिक्षण घेतले. वयाच्या १९ वर्षी अनुप यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. अनुप यांनी गायलेली ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘हुस्न भी आप हैं, इश्क भी आप हैं’ आणि ‘तुम साथ हो जिंदगी भर लिए’ यांसारखी गाणी खूप लोकप्रिय झाली. अनुप यांनी २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर पश्चिम बंगालमधील उत्तरपाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. ते विजयी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top