तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहता! एकनाथ खडसेंची रुग्णालयातून पोस्ट

मुंबई

प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथराव खडसे यांनी एक्स(ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले. खडसे यांना ५ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर जळगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर खडसे यांनी आज एक्स खात्यावर पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती देत मनातल्या भावना व्यक्त केल्या.

‘मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला, मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, असे खडसे यांनी पोस्टमध्ये म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top