Home / News / तुर्कीत भूकंपाचा धक्का

तुर्कीत भूकंपाचा धक्का

इस्तांबुल – तुर्कीत आज दुपारी ३:१९ वाजता भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ नोंदवण्यात आली आहे....

By: E-Paper Navakal

इस्तांबुल – तुर्कीत आज दुपारी ३:१९ वाजता भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू इस्तांबूलपासून सुमारे ७३ किलोमीटर अंतरावर मरमारा समुद्राजवळ होता. या तीव्र भूकंपामुळे इस्तांबुलसह अनेक शहरांतील इमारती हादरल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची अधिकृत नोंद नाही. मात्र भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचा हादरा तुर्कीसह बल्गेरिया, ग्रीस आणि रोमानिया यांसारख्या शेजारी देशांनाही जाणवला.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts