तुळजाभवानीचे दर्शन तीन दिवसपहाटे १ वाजल्यापासून मिळणार

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे मंदिर आता प्रत्येक मंगळवार, शुक्रवार,रविवार व पौर्णिमा दिवशी पहाटे १ वाजता उघडले जाणार आहे. यामुळे या दिवशी भाविकांना पहाटे १ पासूनच देवीचे दर्शन घेता येणार आहे.भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे.

आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह देशातील भाविकांची गर्दी असते.नवरात्रौत्सव काळात तसेच सुट्ट्यांच्या काळात देखील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आता भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदीर संस्थानने एक नवीन निर्णय घेतला आहे.नव्या निर्णयानूसार तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे मंदिर वर्षभरातील प्रत्येक मंगळवार,शुक्रवार,रविवार व पौर्णिमा दिवशी पहाटे १ वाजता उघडले जाणार आहे.पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजा होईल. त्यानंतर सकाळी ६ वाजता घाट देऊन अभिषेक पूजा सुरु होईल अशी माहिती तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सोमनाथ वाडकर यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top