तुळजाभवानी मंदिरातील मुकूट, मंगळसूत्र गायब

धारावीश :

तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा सोन्याचा प्राचीन मुकूट आणि मंगळसूत्र गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस आढळून आले, असून तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. केवळ मुकूट आणि मंगळसूत्रच नाही, तर नेत्रजोड, पादुका आणि हार हे दागिनेही गायब आहेत. तसेच तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी आणि प्राचीन अलंकाराची तपासणी करण्यासाठी १६ सदस्यांची समिती स्थापन केली होती. उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने मंदिर प्रशासनातील अधिकारी, पुजारी मंडळाचे प्रतिनिधी आणि महंतांचा सहभाग होता. या समितीने सादर केलेल्या अहवालातून तुळजाभवानी मंदिरातून वेगवेगळ्या ७ डब्यांमधील शेकडो वर्षांचा इतिहास असलेले अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान दागदागिने गायब असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात दोषी कोण हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते आहे. त्या समितीचा अहवालही एक-दोन दिवसांत येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घ्यायची का, यावर निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top