कोटा – दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये कोटा स्थानकाजवळ चोरी झाली. प्रवाशांचे दागिने, रोख रक्कम लुटण्यात आली. या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या तरुणाने माहिती दिली की दोन व्यक्तींनी स्वत:ला कोच अटेंडर सांगत ही चोरी केली. १२ डिसेंबरला ही चोरी झाली. या तरुणाकडील दोन बॅगांमधील ५४० ग्रॅम सोने आणि ३६.५० लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. जीआरपी पोलीस तपास करत आहेत.