तेलंगणात मोहम्मद अझरुद्दीन यांचा बीआरएस उमेदवाराकडून पराभव

हैद्राबाद

तेलंगणात काँग्रेसच्या वादळात भल्याभल्या उमेदवारांची बोलती बंद झाली, मात्र तेलंगणातील ज्युबली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा बीआरएस उमेदवार मगंथी गोपीनाथ यांनी पराभव केला. मतमोजणीत अझरुद्दीन यांना एकूण ६२,३४३ मते मिळाली. गोपीनाथ यांनी त्यांचा १५,९३९ मतांनी पराभव केला. भाजपचे लंकाला दीपक रेड्डी २५,०८३ मतांसह तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत.

तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये विधानसभेच्या एकूण १५ जागा आहेत. यापैकी एक जागा ज्युबली हिल्स होती. गोपीनाथ यांनी २०१८ मध्येही ही जागा जिंकली होती. त्यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला. इथून अझरुद्दीन यांनी निवडणूक लढवल्याने ज्युबली हिल्स ही हायप्रोफाईल जागा बनली होती. या जागेवर चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा होती, मात्र तेलंगणात काँग्रेसचा दणदणीत विजय होऊनही अझरुद्दीन या मतदारसंघातून पराभूत झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top