तेलंगणात हवाई दलाचे विमान कोसळले !२ ठार

हैदराबाद
तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात सोमवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. मृत वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश असून या अपघाताचे कारण शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुंडीगल वायुसेना अकादमीतून सकाळी ८.५५ वाजता नियमित प्रशिक्षणासाठी भारतीय हवाई दलाच्या विमानाने उड्डाण केले होते. मात्र त्यानंतर हे विमान मेडक जिल्ह्यातील तूप्रन येथे अचानक कोसळले. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वैमानिकांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top