तैवानमध्ये एका रात्रीत भूकंपाचे ८० धक्के

तैपेई

तैपेई तैवानचा पूर्व किनारा पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरला. तैवानमध्ये काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत ८० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले. यातील सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तैपेईमधील अनेक इमारती हादरल्या. यामुळे नागरिक घाबरले होते, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
३ एप्रिल रोजी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये सुमारे १४ लोकांचा मृत्यू झाला होता. १,००० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा भूकंप ग्रामीण आणि डोंगराळ हुआलियन काउंटीच्या किनारपट्टीवर केंद्रीत होता. हा तैवानमधला गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top