थातोड-धारबांदोडा येथे चिरे खाणीवर छापेमारी

फोंडा – थातोड-धारबांदोडा येथे सरकारी प्राथमिक विद्यालयापासून काही अंतरावर सुरू केलेल्या बेकायदेशीर चिरे खाणीवर पोलिसांच्या सहाय्याने खाण खात्याचे अधिकारी व मामलेदार यांनी छापा टाकला. मात्र, कारवाईनंतर काही वेळातच चिरे खाण पुन्हा सुरू झाल्याने कारवाई फक्त नावापुरती असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

थातोड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, खाण खात्याचे अधिकारी, मामलेदार व कुळे पोलीस चिरे खाणीवर दाखल होण्यापूर्वीच तेथील सर्व मशीन हलविली. त्यामुळे अधिकऱ्यांना चिरे खाणीवर काहीच आढळून आले नाही. यासंबंधी मामलेदार लक्ष्मीकांत कुर्टीकर यांनी शनिवारी तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्याच चिरे खाणीवर धाड घातल्यानंतर अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी चिरे खाण मालकाला व अन्य कामगारांना अटक केली होती. परंतु, शनिवारी त्याच चिरे खाणीवर कारवाई केल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केल्याने परिसरातील लोक आश्चर्य व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top