थायलंडमध्ये भीषण बस अपघात १४ ठार, २० जण गंभीर जखमी

बँकॉक

थायलंड देशाच्या पश्चिमेकडील प्रचुआप खीरी खान प्रांतात काल रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील १४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, २० जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला.

ही बस राजधानी बँकॉकहून दक्षिणेकडील सोंगखला प्रांतात जात होती. अपघातावेळी बसमध्ये ४९ प्रवासी होते. या अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढील भाग अर्धा तुटला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकर्त्यांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या अपघातात बसचालक देखील गंभीर जखमी झाला. उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलीस या चालकाची चौकशी करणार आहेत. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागली असावी. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top