Home / News / दक्षिण अक्कलकोटमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

दक्षिण अक्कलकोटमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

अक्कलकोट- सध्या राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस होत असला तरी दक्षिण अक्कलकोट मात्र त्याला अपवाद ठरले आहे. या भागाकडे पावसाने...

By: Team Navakal

अक्कलकोट- सध्या राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस होत असला तरी दक्षिण अक्कलकोट मात्र त्याला अपवाद ठरले आहे. या भागाकडे पावसाने पाठ फिरवली आहे.त्यामुळे अक्कलकोट स्टेशन,जेऊर, जेऊरवाडी,कडबागा व नागणसूर,गौडगांव बु, शावळ,नाविंदगी,तोळनूर, हैद्रा,मराठवाडी,गुरववाडी,आदी भागात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत आहे.

दक्षिण अक्कलकोटमधील जेऊरवाडी,जेऊर, अक्कलकोट स्टेशन, कडबगाव येथे सध्या तीव्र पाणी टंचाई आहे.गेल्या दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने विहीर,बोअरची पाणी पातळी ऐन पावसाळ्यात घटली आहे. काही भागात झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.शेतात गवत वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतात शेतमजूर मिळत नाही,पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.जेऊर येथील पाण्याचा टँकर गेल्या महिन्यात बंद करण्यात आला.त्यामुळे पाण्याची टंचाई आहे.गावात पंधरा दिवसातून एकदा पाणी सोडले जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या