Home / News / दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनान्यायालयाने पदावरून हटवले

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनान्यायालयाने पदावरून हटवले

सेऊल – दक्षिण कोरियाच्या घटनात्मक न्यायालयाने संसदेच्या निर्णयाला मान्यता देत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.यून यांनी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सेऊल – दक्षिण कोरियाच्या घटनात्मक न्यायालयाने संसदेच्या निर्णयाला मान्यता देत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.यून यांनी 3 डिसेंबर 2024 रोजी देशात उत्तर कोरियातील काम्युनिस्टांपासून संरक्षण करण्यासाठी देशाचे मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू केला होता. न्यायालयाने हे कृत्य घटनाबाह्य ठरवले. यून यांच्यावर महाभियोग दाखल करण्यात आला असून त्यात दोषी आढळल्यास त्यांना गंभीर शिक्षेस सामोरे जावे लागू शकते.या निर्णयानंतर कार्यकारी राष्ट्राध्यक्ष हान डक-सू हे निवडणूक होईपर्यंत देशाचे प्रमुख राहतील. त्यांनी देशात स्थिरता राखण्याचे आणि आगामी 60 दिवसांत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपर्यंत सुव्यवस्थित सत्ता हस्तांतरण सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या