दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ५० लाख मोग-याचा पुष्पनैवेद्य दाखवण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. या पुष्पसजावटीची तयारी २५० महिला व १०० पुरुष कारागिर दोन दिवसांपासून करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३५०० किलो गुलछडी, ८०० किलो झेंडू, १२० किलो कन्हेर फुले, १ लाख गुलाब, ७० हजार चाफा, १०० कमळे, १ लाख लिली, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top