दत्तक मुलगी बेपत्ता झाल्याने कलाकार दाम्पत्याची आत्महत्या

बंगळुरू

उडिपीमधील रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार लीलाधर शेट्टी (६८) आणि त्यांची पत्नी वसुंधरा शेट्टी (५९) यांनी दत्तक मुलगी बेपत्ता झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. ही घटना कर्नाटकच्या उडिपी जिल्ह्यातील कौप तालुक्यात घडली. या दाम्पत्याने गेल्या वर्षी एका १६ वर्षांपूर्वी मुलीला दत्तक घेतले होते, मात्र ही मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याचे दुःख शेट्टी दाम्पत्याला सहन झाले नाही.

लीलाधर आणि त्यांची पत्नी वसुंधरा यांचे मृतदेह मंगळवारी त्यांच्या राहत्या घरात आढळले. हे दोघेही गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता त्यांना एक मृत्यूपूर्व चिट्ठी सापडली, मात्र त्यातील मजकुराबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही. हे दाम्पत्य कौप तालुक्यातील मजूर गावात राहत होते. दरम्यान, ही मुलगी त्यांच्याच घरी काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत पळून गेल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे दाम्पत्याला धक्का बसला होता, असे सांगितले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top