दाऊदचा कट्टर दुश्मन छोटा राजन जिवंत आहे

नवी दिल्ली – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कट्टर दुश्मन गँगस्टर छोटा राजन उर्फ राजन निकाळजे हा जिवंत आहे. त्याचे अगदी अलीकडचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोरोना काळात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा होती.
दाऊद इब्राहिमसाठी छोटा राजन काम करीत होता. मात्र 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर तो दाऊदचा दुश्मन बनला. तेव्हापासून दाऊदने त्याला ठार करण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला आहे. 2000 साली बँकॉकमध्ये त्याच्यावर हल्ला झाला, मात्र तिथून निसटण्यात त्याला यश आले. 2015 साली इंडोनेशिया येथून प्रत्यार्पण होऊन छोटा राजनला भारतात आणले. तेव्हापासून तो तिहार जेलच्या बॅरेक 2 मध्ये आहे. तिथेेही त्याला ठार करण्यासाठी दाऊदचा उजवा हात शकीलने हल्लेखोर पाठवले होते, पण विशेष गुन्हे शाखेने या चारही हल्लेखोरांना पकडले. त्यानंतर कोरोना काळात छोटा राजनचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात मृत्यू झाल्याची बातमी पसरली.
आता छोटा राजनचे अलीकडचे फोटो प्रसारित झाले आहेत. या फोटोत तो रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. त्याला ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे, पण एकूण त्याची प्रकृती ठीक दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top