दादरचे प्रसिद्ध साडी शोरुम भरतक्षेत्रवर ईडीची धाड

मुंबई –

दादर येथील दादासाहेब फाळके रोडवरील प्रसिद्ध भरतक्षेत्र या साडी दुकानावर आजे ईडीची धाड पडली. विवाहासाठी कपडे खरेदीसाठी मुंबईतील हे शोरुम आकर्षणाचं केंद्र आहे. ईडीने सकाळी साडेदहाच्या सुमारास येथे धाड टाकून काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हवालामार्फत मोठ्या प्रमाणावर देवाण घेवाणचे व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. काही राजकीय नेते व भरतक्षेत्र यामध्ये आर्थिक संबंध असल्याचेही बोलले जात आहे. या धाडीमुळे दादरमध्ये एकच खळबळ उडाली होती. आर्थिक अफराताफर केल्याप्रकरणी ही धाड टाकल्याची माहिती समोर आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top