दादरच्या प्राणी संग्रहालयाला वनविभागाने नोटीस बजावली

मुंबई

दादर येथील मुंबई महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात ३ ऑक्टोबर रोजी मगरीचे पिल्लू सापडले होते. हे मगरीचे पिल्लू शेजारील प्राणी संग्रहालयातून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आले. यानंतर वन विभागाने या प्राणी संग्रहालयाला नोटीस बजावली आहे. त्यांना जलचर प्राणी पक्ष्यांसाठी सेंट्रल झू ॲथोरिटीची परवानगी घेतलेली कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश नोटिशीतून दिले आहेत.

महात्मा गांधी जलतरण तलावात ३ ऑक्टोबर रोजी सापडलेले मगरीचे पिल्लू प्राणी संग्रहालयातून आल्याचे समजल्यावर पालिका प्रशासनाने प्राणी संग्रहालयाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली. हे प्रकरण वन विभागाच्या अंतर्गत येत असल्याने वन विभागाकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर वन विभागाने प्राणी संग्रहालयास नोटीस बजावली असून, त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top