दादर प्राणीसंग्रहालय बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी नोटीस

मुंबई – दादरच्या प्राणी संग्रहालयातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून एमआरटीपी कायद्यान्वये नोटीस बजावण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कमधील स्विमिंग पूलमध्ये याच प्राणी संग्रहालयातून मगर आली होती.त्यावेळी मनसेने या प्राणी संग्रहालयाविरोधात महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पालिका प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली आहे.
दादर प्राणीसंग्रहालयातील बांधकामावर नोटीस बजावण्यात आली आहे. या प्राणीसंग्रहालयात जे शेड्स उभारण्यात आले आहेत, त्याला एमआरटीपी कायद्यांतर्गत पालिकेने नोटीस बजावली आहे.हे बेकायदा बांधकाम येत्या १५ दिवसांत स्वतःहून पाडावे, अन्यथा पालिका कारवाई करेल असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. दादरमधील प्राणीसंग्रहालय शिवाजी पार्क परिसरात आहे.
याच प्राणीसंग्रहालयातील मगर शेजारी असलेल्या महात्मा गांधी जलतरण तलावात गेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. प्राणीसंग्रहालयातूनच ही मगर आल्याचा आरोप मनसे आणि स्थानिकांनी केला होता.तसेच कारवाईची मागणीही करण्यात आली होती.त्याचप्रमाणे प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी मनसेने केली होती.दरम्यान, वनविभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्राणीसंग्रहालयात पिंजर्‍यासाठी बांबू आणि पॉलिथिन वापरुन सात ते आठ प्रकारचे शेड बांधण्यात आले आहेत.हे बांधकाम अनधिकृत असल्याचे पालिकेच्या जी उत्तर विभागाचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top